आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकाला एसटीत नोकरी : दिवाकर रावते यांची घोषणा 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात 42 जणांनी आत्महत्या करत बलिदान दिले. या आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांपैकी एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात 58 मुक मोर्चे, आंदोलने, उपोषण…आदि माध्यमातून लढा उभारण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान 42 जणांनी आपला जीव गमावला आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना अद्याप सरकारकडून ठोस मदत मिळालेली नाही. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना मदत द्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 42 जणांच्या कुटुंबियांना15 लाखाची मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली होती.

-Ads-

आझाद मैदान येथे एका मराठा संघटनेने उपोषण पुकारले होते. या उपोषणकर्त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या उपोषणकर्त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची तसेच बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलासा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्याची घोषणा केली. या संदर्भातील नोकरभरतीचे ते निकष लवकरच जाहीर करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)