भिवंडीत जमिनीच्या वादातून भररस्त्यावर एकाची हत्या 

भिवंडी – जमिनीच्या वादातून भररस्त्यात एकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार भिवंडीतील गैबीनगर येथे घडला आहे. या हल्ल्यात युवकाचा जागीच त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद आवेश सईद अहमद अन्सारी असे मृताचे नाव आहे. तो शांतीनगर पिराणीपाडा येथील रहिवासी होता.

रविवारी घरी पाहुणे येणार असल्याने आवेश पत्नीसह दुचाकीवर बाजारात निघाला होता. त्यावेळी शेजारी राहणारा अफरोज आणि त्याचे साथीदार यांनी रिक्षाने आवेशचा पाठलाग केला. काही अंतरावर पाठलाग करणाऱ्या रिक्षाने आवेशच्या बाईकला धडक दिली. धडकेनंतर आवेश आणि त्याची पत्नी कुलसुम उर्फ जोया खाली पडले. त्यावेळी अफरोज अन्सारी व त्याच्या साथीदारांनी आवेशच्या पत्नीसमोरच त्याच्यावर चॉपरने सपासप 7 ते 8 वार केले.

-Ads-

या हल्ल्यात आवेशचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणात घटनेची माहिती संपूर्ण परिसरात पसरली. त्यानंतर नागरिकांनी अफरोजच्या घरावर हल्लाबोल करत घराचे मोठे नुकसान केले. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अफरोज अन्सारीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)