शुल्लक कारणावरून एकाचा खून

हिंगोली, (प्रतिनिधी) : वसमत तालुक्‍यातील कुरुंदा येथे क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी कुरुंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळू उर्फ सखाराम सुदाम गाडे (36) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी मयत बाळू उर्फ सखाराम आणि आरोपी वाहुळे यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला होता.

या भांडणात आरोपीने फिर्यादीला ढकलून दिले आणि त्याला दगडाने मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादीच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. जखमी बाळू उर्फ सखाराम याला वसमत येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो उपचार घेऊन घरी परतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी मृत्यू झाला. सदर घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिसांनी मयताचे वसमत येथे शवविच्छेदन केले. मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)