नगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी येथील घटना
नगर: टाकळी काझी शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी झालेल्या अपघाताबाबत काल नगर तालुका पोलीस ठाण्यात टाटा एस टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम यशवंत बोराडे (रा. सारोळा बद्धी, ता. नगर) हे मयत झाले आहेत. सुलोचना उत्तम बोराडे, शिवतेज प्रमोद बोराडे हे दोघे जखमी झाले आहेत. जामखेडकडून नगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने (क्र. एमएच- 12 क्यूडब्ल्यू 9078) सारोळाबद्दीकडून मदडगावकडे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. एक जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पोपट यशवंत बोरुडे यांच्या फिर्यादीवरून टाटा एस टेम्पोच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस बी. व्ही. सोनवणे हे करीत आहेत.