नवी दिल्ली -टिक टॉक वर व्हिडिओ बनवणुयासाठी दोन तरुणांनी नदीत उडी मारली. यात एक जणाला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, दुसरा अद्यापही बेपत्ता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका नदीच्या पुलावरुन सोमवारी संध्याकाळी दोन तरुणांनी उडी मारली. यात 19 वर्षीय दानिश आणि त्याचा मित्र आशिक याचा समावेश असून दानिश याला स्थानिक नागरिकांनी नदीत बुडताना पाहिले आणि तात्काळ बाहेर काढले. मात्र, त्याचा मित्र आशिक हा अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. यावेळी दानिशचा बुडून मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वातआधी दानिश पुलाच्या कठड्यावर चढला आणि नदीत उडी मारली. ही संपूर्ण घटना आशिक आपल्या मोबाइलमध्ये शूट करत होता त्यानंतर आशिकनेही नदीत उडी मारली. दानिश हा हैदराबादमधील येथील निवासी असून आपल्या नातेवाईकांकडे आला होता.
नातेवाईकांच्या शेजारी राहणारा रिक्षाचालक आशिक याच्यासोबत दानिशची मैत्री झाली होती. त्यानंतर ते टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गेले होते.