पाकिस्तानच्या गोळीबारात १ जवान जखमी तर एका महिलेचा मृत्यू

जम्मू-काश्मीर : पाकिस्तान कडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये  आज एका महिलेचा मृत्यू झाला तर भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला. “एलओसी’ जवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमधील भागांमध्ये पाकिस्तानने  गोळीबार केला आहे.

गुरुवारी पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय बाजूकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून “एलओसी’वरील चौक्‍यांवर गोळीबार होण्याचा हा सलग सातवा दिवस आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एयरस्ट्राईक मुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान  इम्रान खान एकीकडे शांती प्रस्थापित करण्याचे बोलत आहेत. तर दुसरीकडे सीमेवर सतत गोळीबार सुरु आहे. त्यामुळे पाकिस्तान दुतोंडी असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)