पंजाबमधील ग्रेनेड हल्ला प्रकरणी एकाला अटक 

चंडीगढ – पंजाबमधील ग्रेनेड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. बिक्रमजित सिंग असे त्याचे नाव आहे. आता त्याचा साथीदार अवतार सिंग याच्या मागावर सुरक्षा आणि तपास यंत्रणा आहेत.  पंजाबच्या अमृतसरनजीक असणाऱ्या गावातील निरंकारी भवनावर रविवारी ग्रेनेड हल्ला झाला. त्या हल्ल्यात तिघे मृत्युमुखी पडले, तर 20 जण जखमी झाले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तो हल्ला केला. त्या हल्ला प्रकरणी झालेल्या अटकेची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी आरोपींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली.

निरंकारी भवनावरील ग्रेनेड हल्ला म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याचा पुनरूच्चार अमरिंदर यांनी केला. त्यांनी याआधी त्या हल्ल्याबद्दल पाकिस्तानकडे बोट केले होते. पंजाबमध्ये कारवाया करण्यासाठी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था सक्रिय असल्याचे त्यांनी आज म्हटले. दरम्यान, हल्ला प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असणारे आरोपी खलिस्तान लिबरेशन फोर्सचे सदस्य आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)