जम्मू काश्मीर : कटारा जवळ ट्रकमधून एके-47 आणि 3 मॅगझिन्स जप्त

नवी दिल्ली – जम्मूमधील सुकेतर क्षेत्रामध्ये  दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे हाय अलर्ट जाहिर करण्यात आला होता. यादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील कटारा क्राँसिंग जवळ पोलिसांनी एका ट्रकमधून एके-47 आणि तीन मॅगझिन्स जप्त केल्या आहेत. ट्रक चालक आणि वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी चालू आहे.

दरम्यान ट्रकमधून पळून गेलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांचा शोध चालू आहे. या शोधमोहिमेसाठी संपूर्ण क्षेत्रात घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी परिसरात हाय अर्लंट जाहिर केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून संशियत दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)