येदियुरप्पांच्या ‘त्या’ वक्तव्यावर व्ही. के. सिंह नाराज

नवी दिल्ली – एयर स्ट्राईकमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पुन्हा आली असून आगामी निवडणुकीत कर्नाटकात २२ जागांवर विजय मिळवू, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे. या वक्तव्यावर विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी असहमती दर्शवली आहे.

व्ही. के. सिंह म्हणाले कि, येदियुरप्पा यांनी मला क्षमा करावे. परंतु, मी तुमच्या वक्तव्याशी सहमत नाही. आपण एक राष्ट्राच्या स्वरूपात आहोत. सरकारद्वारे केलेली कारवाई राष्ट्र आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी होती. काही जागा जिंकण्यासाठी नव्हे, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटसोबत व्ही. के. सिंह माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषणही शेअर केले आहे. सरकार येणार जाणार, पण केवळ देश राहिला पाहिजे, असे वाजपेयी म्हणत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, येदियुरप्पा यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ घेण्यात आला. मी फक्त सध्या वारे भाजपाच्या दिशेने वाहत असल्याचे म्हटले. हे मी मागील अनेक महिन्यांपासून म्हणत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा कर्नाटकमध्ये २२ जागा जिंकेल हे मी याआधीही म्हटलं आहे, असे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/BSYBJP/status/1101002107954565120

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)