लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर लोकसभेतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभेत भाजपच्या दिंडोरीच्या खासदार डॉक्टर ‘भारती पवार’ यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ असून, भाषणावेळी बीडच्या खासदार ‘प्रीतम मुंडे’ आणि रावेरच्या खासदार ‘रक्षा खडसेंना’ हसू अनावर झाले. मात्र, त्याचं हे हसन नेटकऱ्यांना फारसं आवडलं नसून त्यांच्यावर टीका केली आहे.

मात्र, व्हायरल व्हिडीओ नंतर रक्षा खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. “डॉ. भारती पवार यांच्या भाषणाशी आमचा संबंध नव्हता. उलट, त्यांना समर्थन देण्यासाठी त्या दिवशी आम्ही सभागृहात रात्री ११.३० वाजेपर्यंत उपस्थित होतो. आणि हसण्याचा विषय इतका गंभीरपणे घ्यायची गरज नाही, संसदेत हास्य-विनोद होतच असतात”. असं त्यांनी म्हंटल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)