“दक्षिणे’साठी पहिल्याच दिवशी 21 जणांनी नेले 39 अर्ज

चार एप्रिलपर्यंत नामनिर्देशन भरता येणार

नगर: दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी होताच पहिल्याच दिवशी 21 जणांनी 39 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज नेणाऱ्यांमध्ये काही राजकीय पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

चंद्रकांत रेणावीकर (सावेडी, दोन अर्ज ठिकाण आणि अर्जाची संख्या कंसात आहे), श्रीधर दरेकर (नगर, दोन अर्ज), कलीराम पोपळघट (संगमनेर, तीन अर्ज), ज्ञानदेव पाडळे (देवगांव, ता. नेवासा चार अर्ज), बहुजन समाजवादी पक्षाचे ऍड. नामदेव वाळके (सावेडी, नगर, चार अर्ज), सुधाकर आव्हाड (मजले चिंचोली, नगर, चार अर्ज), साईनाथ घोरपडे (रा. वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी एक अर्ज), सुरेश रासकर (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, एक अर्ज), दत्तात्रय वाघमोडे (रा. शिराढोण, नगर, एक अर्ज), विलास लाकुडझोडे (रा. श्रीगोंदा, दोन अर्ज), सुनील देठे (रा. शेंडी, ता. नगर, एक अर्ज), भास्कर पाटोळे (रा. नगर, एक अर्ज), भागवत धोंडिंबा (रा. कवठे कमळेश्‍वर, ता. संगमनेर, एक अर्ज) नेले.
संदीप संसारे यांनी शिवप्रहारचे संजीव भोर यांच्यासाठी (रा. गुलमोहोर रोड, सावेडी) यांच्यासाठी दोन अर्ज नेले आहेत. नीलेश गाडेकर यांनी राष्ट्रवादीचे नेते सबाजीराव गायकवाड (रा. पारनेर) यांच्यासाठी दोन अर्ज नेले, रियाजोद्दिन शेख (रा. झेंडिगेट, दोन अर्ज), विजय पवार (रा. पाडळी, ता. जामखेड, एक अर्ज), शांताराम बनसोडे (रा. साकुरी, ता. राहाता, एक अर्ज), अनिल ठवाळ (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदे, एक अर्ज), सुनील राऊत (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, दोन अर्ज), प्रकाश लोंढे (रा. गोविंदपुरा, नगर, एक अर्ज) यांनी अर्ज नेले आहेत. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे नियोजन भवनातील दालन निश्‍चित करण्यात आले आहे. निवडणूक कक्षात मदतीसाठी 17 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल असणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करुन अर्ज भरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी नामनिर्देशन स्वीकारण्याच्या ठिकाणी उमेदवार सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)