लागोपाठ दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात तेजीचे वातावरण; निर्देशांक 630 अंकांनी वधारला

मुंबई: मुंबई शेअर बाजारात आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण दिसून आले. आज दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 629.06 अंकांची वाढ झाली ही वाढ 1.79 टक्के इतकी आहे तर राष्ट्रीय शेअरबाजाराच्या निर्देशांकात 188.45 अंकांची वाढ झाली. रिझर्व्ह बॅंकेच्या अध्यक्षपदावर शक्तिकांत दास यांच्या झालेल्या नियुक्तीचे गुंतवणुकदारांनी खुल्या दिलाने स्वागत केल्याचे हे लक्षण मानले जात आहे.

आज दिवसभराच्या घडामोडीनंतर वाहन उद्योग, रिऍलिटी, धातू, कॅपिटल गुड्‌स, आणि वित्तीय संस्थां या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले. आज हिरो मोटोकॉर्प. कंपनीचा शेअर 7.01 टक्‍क्‍यांनी वधारला. त्या खालोखाल भारती एअरटेलचा शेअर 6.69 टक्‍क्‍यांनी, येस बॅंकेचा शेअर 5.30 टक्‍क्‍यांनी, अडाणी पोर्टचा शेअर 4.90 टक्‍क्‍यांनी, टाटा स्टीलचा शेअर 3.75 टक्‍क्‍यांनी तर बजाज ऑटो कंपनीचा शेअर 3.70 टक्‍क्‍यांनी वधारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिझर्व्ह बॅंकेच्या अध्यक्षपदी झालेल्या नवीन नेमणुकीमुळे बाजारात भांडवल सुलभता निर्माण होईल अशी गुंतवणुकदारांची भावना आहे त्यामुळेच हा बाजार वधारला असे सांगितले जात आहे. आज विदेशी संस्थांनी 2421 कोटी रूपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशी गुंतवणुकदार संस्थांनी 2255 कोटी रूपयांच्या शेअर्सची खरेदी केली. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत 1.86 टक्के इतकी वाढ होऊन कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल 61.32 डॉलर्स इतकी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)