राम मंदिराच्या मुद्यावर सेनेचा भाजपला खो

संसदेत जोरदार घोषणाबाजी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नावावर असलेले राम मंदिराचे पेटंट आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करीत शिवसेनेने आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. “हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, “मोदी-योगी सरकार में, राम लल्ला तंबू में’ अशा घोषणा देत शिवसेनेने भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार राम मंदिरासाठी कायदा करीत नाही किंवा अध्यादेश काढत नाही तोपर्यंत सेना स्वस्थ बसणार नाही, असा दावा सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सेनेच्या खासदारांनी गांधी पुतळ्यासमोर हातात फलक घेवून जोरदार घोषणाबाजी केली. यात सेनेचे राज्यसभेतील नेते संजय राउत, लोकसभेतील नेते आनंदराव अडसूळ, श्रीरंग अप्पा बारणे, गजानन किर्तीकर, चंद्रकांत खैरे, विनायक राउत, कृपाल तुमाने आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाग घेतला.

राम मंदिर हा हिंदुच्या आस्थेचा विषय आहे. अयोध्येत मंदिर व्हावे ही समस्त हिंदूंची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा 2014 मध्ये मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 2019 ची निवडणूक तोंडावर आली तरी सरकार काहीही करायला तयार नाही. ही बाब सेना अजिबात खपवून घेणार नाही, अशी भूमिका सेनेने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)