महामार्गावर ऊस वाहनांचा ‘नागीण डान्स’

सातारा – ऊस तोडीचा हंगाम सुरु झाल्याने कारखान्याची मैदाने ऊसतोड मजुरांनी भरली आहेत. त्याच प्रमाणे महामार्गावरही ऊस वाहतुकीची वर्दळ दिसू लागली आहे. विशेष म्हणजे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा महामार्गावर जणू नागीन डान्सच सुरु झाला आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदा गळीत हंगाम सुरु झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांवर ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या टोळ्या डेरेदाखल झाल्या आहेत. तसेच प्रत्यक्षात ऊसतोडीलाही सुरुवात झाली आहे. ऊसाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. एका ट्रॅक्‍टरला दोन ट्रॉली हे ठरलेलं गणित. जेव्हा महामार्गावरुन हे ट्रॅक्‍टर दोन-दोन ट्रॉली ऊस भरुन घेऊन जात असतात त्यावेळी ट्रॅक्‍टर थोडा जरी इकडे-तिकडे वळला की मागे ट्रॉलीही नागमोडी वळणे घेण्यास सुरुवात करते. जणूकाही ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा महामार्गावर सध्या नागीन डान्सच सुरु झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)