पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मोदींनी पाकिस्तानला दिल्या शुभेच्छा

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला होता. त्यानंतर आज पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून पाकिस्तानला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करून नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश प्राप्त झाल्याचे म्हंटले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देत लोकशाही, शांततापूर्ण, प्रगतीशील आणि समृद्ध प्रदेशासाठी एकत्र काम करण्याची वेळ असल्याचे म्हंटले आहे. उपमहाद्वीप मध्ये दहशतवाद आणि हिंसा मुक्त वातावरण असणे हे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.

तत्पूर्वी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला जम्मू काश्मीर मधील फुटीरतावादी नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आल्यामुळे भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्याचे समजले होते. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला सरकारचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

पुलवामाच्या घटनेनंतर आणि बालाकोट येथील भारताच्या कारवाई नंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)