वाराणसीत लढाई ‘असली’ विरुद्ध ‘नकली’ चौकीदाराची : यादव

चंडीगढ  – सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा संकल्प जाहीर केला असल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तेजबहादूर यांचे नाव सुमारे दोन वर्षांपूर्वी बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार केल्यामुळे मोठ्या चर्चेत आले होते. मात्र त्यांच्या या तक्रारीमुळे त्यांच्यावर बेशिस्तीची कारवाई करत बडतर्फ करण्यात आले होते.

दरम्यान, आज तेजबहादूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेजबहादूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणतात की, “पंतप्रधानांनी सत्तेत येण्यापूर्वी अर्धसैनिक दलांमधील जवानांना देखील शहीद दर्जा दिला जाईल असं म्हंटल होत तसेच त्यांनी निवृत्तिवेतनाबाबत देखील आश्वासन दिलं होतं मी निवडणुकांमध्ये मोदींना विचारीन तुम्ही दिलेल्या अश्वसनांचं काय झालं? मोदींविरुद्ध होणाऱ्या या लढतीमध्ये मी देखील मोदींप्रमाणेच तुल्यबळ असून एका बाजूला सैन्य दलातील असली चौकीदार आहे तर दुसऱ्या बाजूला मोदी म्हणजे नकली चौकीदार आहेत.”

https://twitter.com/ANI/status/1112302464793870337

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)