एकीकडे १५ मजूर खाणीत अडकलेत आणि दुसरीकडे मोदी फोटोंसाठी पोझ देत फिरतायेत : राहुल

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या कालच्या आसाम येथील रेल्वे पुलाच्या उद्धघाटनावरून उपरोधिक ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून “एकीकडे मेघालयातील खाणीत पंधरा मजुर गेल्या 13 डिसेंबर पासून अडकलेले आहेत. बचाव कार्यासाठी लागणारी आधुनिक सामग्री नसल्यामुळे या कामगारांना वाचवण्याच्या मदत कार्याला अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे आपले पंतप्रधान जाहीर कार्यक्रमांमध्ये फोटोपोझ देऊन वेळ वाया घालवण्यामध्ये व्यस्त आहेत. कृपया मोदींनी बचावकार्यासाठी लागणारी सामग्री पुरवून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.” असे ट्विट केले आहे.

मेघालयातील कोळसा खाणीत हे कामगार अडकले असुन खाणीत पाणी भरले आहे. ते पाणी बाहेर खेचण्यासाठी अतिशक्तीशाली पंप तेथे उपलब्ध नाहीत. राज्य सरकारकडे त्यासाठी पुरेशी यंत्रणाही नाही त्यामुळे केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी या कामगारांना त्वरीत वाचवावे असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/RahulGandhi/status/1077812661847502848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)