मराठा आरक्षणासाठी विधानभवनावर 26 नोव्हेंबरला गाडी मोर्चा 

संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर – मराठा आरक्षणासंबंधी राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. पण या अहवालाची गोपनीयताच राहिली नसल्याने मराठा समाजाचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे “आरक्षण द्या, नाहीतर पायउतार व्हा’ या मागणीसाठी 26 नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने विधानभवनावर गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी दिली.
मुळीक म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. शिवाय 42 दिवस ठिय्या आंदोलनही करण्यात आले. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
याशिवाय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहीने 22 मागण्या मान्य झाल्याचे पत्रही देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही मागणीची पूर्तता झालेली नाही. संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहात आहे, तो अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. पण या अहवालाची गोपनीयताच राहिली नाही. त्यामुळे मराठा समाजाचा या सरकारवरील विश्वास उडाला असून सरकारच्या भूलथापांना न फसता रस्त्यावर लढण्याचा निर्धार मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रातून गाडी मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे, असे त्यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)