कळसूबाई शिखरावर 62 मीटर तिरंगा

अकोले – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग यासाठी प्रेरणा मिळावी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व 360 एक्‍सप्लोरर ग्रुपने सह्याद्री पर्वतरांगांमधील कळसूबाई शिखरावर 12 फूट उंची आणि 62 मीटर लांबीचा तिरंगा फडकविला. त्यांनी एक आगळी वेगळी मोहीम आखली आणि ती शेकडो युवकांच्या सहभागाने यशस्वीही केली.

या वेळी भंडारदरा टुरीझमच्या लोगोचेही अनावरण झाले. देशाची शान असलेला तिरंगा कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसत आहे. कळसूबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून 1 हजार 646 मीटर उंची असलेले राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. गिर्यारोहकांना कायम कळसूबाई शिखर आव्हान देते. ही एक आम्ही आगळीवेगळी मोहीम आखली होती. संपूर्ण राज्यतून या मोहिमेत शेकडो युवक सहभागी झाले. हा देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. याचबरोबर भंडारदरा टुरीझम या वेबसाईच्या लोगोचे अनावरणही कळसूबाई शिखरावर पार पडले, असे भंडारदरा टुरीझमचे अध्यक्ष विजया ठोंबाडे व संस्थापक रवी ठोंबाडे यांनी सांगितले.

आनंद बनसोडे व त्यांच्या टीमने स्वातंत्र्यदिनी पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखर चढाईस सुरवात केली. तर सकाळी सात वाजता सर्वात लांब व मोठा उंच ध्वज कळसूबाई शिखरावर फडकवण्यात आला. यावेळी वरुणराजाने हजेरी लावून वातावरण प्रसन्न बनवले. यावेळी राष्ट्रगीत म्हटले गेले व संविधानाचे वाचन करून संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. जागतिक विश्‍वविक्रम करण्याच्या या उपक्रमात महाराष्ट्रातून अनेक पर्यटक, ट्रेकरनी हजेरी लावली होती. यामुळे अकोले तालुक्‍याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. निसर्ग साधन, संपत्तीला नुकसान न पोहचवता, पर्यटन, रोजगार यांचा समेट घडवण्याचे प्रशिक्षण पर्यटकांना देण्यात येईल. याच बरोबरीने प्रशिक्षित गाईड, लेखी, तोंडी माहिती पर्यटकांना पुरवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)