कोल्हापूरात नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर 

कोल्हापूर  – भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणला.

नोटाबंदी करून सरकारने देशाला भिकेला लावल्याची टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. सुरेश कुराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेधाचे फलक व पक्षाचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. यानंतर नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारचे करायचे काय?, मोदी सरकार हाय हाय? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा पांढरा झाला, नोटाबंदी स्वतंत्र भारतातील मोठा घोटाळा, मोदीजी देशाची माफी मागा, अशा लक्षवेधी फलकांद्वारे निषेध करण्यात आला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)