ओमप्रकाश चौतालांकडून आपल्याच मुलाची पक्षातून हकालपट्टी 

चंदिगड – ‘इंडियन नॅशनल लोक दल’  पार्टीचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव अजय सिंह यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपातून चौताला यांनी अजय सिंह यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून हकालपट्टी केली आहे.

अजय सिंह यांची हकालपट्टी करण्याबाबतचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. अजय सिंह यांचे धाकट बंधू आणि हरियाणा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अभय सिंह चौताला यांनी पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयाची माहिती दिली.

हरियाणातील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्याने अजय सिंह आणि ओमप्रकाश चौताला यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. अजय सिंह सध्या दोन आठवड्यांचा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले आहेत. अजय सिंह यांना “आयएमएलडी’ पक्षाच्या हरियाणा प्रदेश सरचिटणीस पदावरूनही हटवण्यात आले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी चौताला यांनी खासदार दुष्यंत आणि त्यांचे बंधू दिग्विजय या अजय सिंह यांच्या दोन्ही मुलांनाही पक्षातून हाकलले होते. तेंव्हापासून चौताला कुटुंबातील वाद सार्वजनिकपणे उघड झाले होते. अजय सिंह यांच्या पत्नी आणि पक्षाच्या आमदार नयना चौताला यांनी आपल्या दोन्ही मुलांवरील कारवाईनंतर पक्षातील विरोधकांवर टीका केली आहे. मात्र नयना चौताला यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

अजय सिंह चौताला यांनी कोणतेही अधिकार नसताना 17 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिंद येथे बैठक बोलावली होती. त्यांचे हे कृत्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलून समांतर यंत्रणा राबवण्याची टीका ओमप्रकाश चौताला यांनी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)