ओमप्रकाश बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा लोकसभेवर निवडून आलेले खासदार ओमप्रकाश बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, या पदासाठी त्यांच्या उमेदवारीची औपचारीक घोषणा मंगळवारी  करण्यात आली होती. ते राजस्थानातील बुंदी-कोटा मतदार संघातील खासदार आहेत. ओमप्रकाश बिर्ला यांचा नावाच्या प्रस्तावाला एआयडीएमके, वायएसआर कॉंग्रेस, आणि बिजू जनता दल या पक्षांनीहीं पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बिर्ला यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे ओम बिर्ला हे आता १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष असतील.  यावेळी  मोदी म्हणाले, मी वैयक्तिकरित्या ओमजींसोबत अनेक वर्षे काम केले आहे. ते राजस्थानातील कोटाचे प्रतिनिधीत्व करतात. हे शहर एक प्रकारे मिनी भारतच आहे. त्यांनी आपले सार्वजनिक जीवन एक विद्यार्थी नेता म्हणून सुरु केले होते. त्यानंतरही ते अद्यापर्यंत अव्याहतपणे समाजासाठी काम करीत आहेत.


तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नाव या पदासाठी सूचित केले होते. लोकसभा सभापतीपदासाठी आज निवडणूक झाली असता लोकसभा अध्यक्षपदी ओमप्रकाश बिर्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे. 57 वर्षीय बिर्ला हे राजस्थानात तीन वेळ आमदार म्हणूनही या आधी निवडून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)