लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच एकदम चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला आहे. 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी याबद्दल संसदीय कॅबिनेटचे आभारही मानले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही मंत्रिमंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो, असे अमिता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज दुपारी बिर्ला अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करणार आहे. नुकतेच, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबद एक मोठा निर्यणय घेण्यात आला होता. भाजपातील जेष्ठ नेते ‘जे.पी. नड्डा’ यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बिर्ला हे त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. मात्र, बिर्ला यांच्या पत्नी अमिता यांनी ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल अभिमान आणि अत्यानंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, त्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभारही मानले आहेत. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)