तेलाच्या टॅंकरच्या धडकेनंतर 50 ठार 

संग्रहित छायाचित्र
किन्शासा: कॉंगोच्या पश्‍चिम भागात तेलाच्या एका टॅंकरची दुसऱ्या वाहनाला धडक बसून झालेल्या अपघातात किमान 50 जण ठार झाले तर 100 पेक्षा अधिक जण भाजले आहेत. या भागातील प्रभारी राज्यपालांच्यावतीने ही माहिती देण्यात आली. तेलाच्या टॅंकरने पेट घेतल्यानंतर किमान 50 जण मरण पावले तर 100 पेक्षा अधिक जणांना भाजल्याची दुखापत झाली आहे, असे कोंगो सेंट्रल प्रांताचे अताउ मताबुआना यांनी सांगितले असल्याचे कॉंगो प्रजासत्ताकच्या एका वृत्तवाहिनीवर म्हटले आहे. 2010 मध्ये कॉंगोमध्ये तेलाचा एक टॅंकर उलटून झालेल्या स्फोटात किमान 230 जण मरण पावले होते. त्या स्फोटानंतर उठलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे जवळपासची घरे आणि थिएटरलाही आग लागली होती. या थिएटरमध्ये गर्दी होती, त्यामुळे मृतांचा आकडा वाढला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)