करकपातीनंतर इंधन दरवाढ सुरूच 

नवी दिल्ली: केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या करात कपात करून सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिला होता. तर डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली. मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रति लिटर 14 पैशांनी पेट्रोलची दरवाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 14 पैशांनी, तर डिझेलचे दर प्रति लिटर 31 पैशांनी महागले आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोल प्रति लिटर 87.29 रूपये, तर डिझेल 77.06 रूपये प्रति लिटर मिळेल.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये 4.36 रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ 2.59 रुपयांची कपात करण्यात आली. 2014 मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 60 रुपयांच्या आसपास होता. 2017 मध्ये तो 80 रुपयांच्या पुढे गेला आहे.
मागील महिनाभराचा विचार केल्यास एकाच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांसह वाहतूकदारांनाही त्याची झळ बसत होती. यंदाच्या मे महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पहिला उच्चांक नोंदविला गेला होता. या कालावधीत पेट्रोल 86 रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर 72.50 रुपयांपुढे पोहोचला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात पेट्रोलच्या दराने नव्वदी ओलांडून सर्वच उच्चांक मोडीत काढले होते.
करकपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळून पेट्रोलचे दर नव्वदीच्या खाली उतरले आहेत. डिझेलच्या दरात शनिवारी 70 पैशांचा दिलासा मिळाला. मात्र डिझेलसह पेट्रोलच्या दरांत रविवारी पुन्हा काही पैशांनी वाढ झाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)