मोदी सरकारला सामान्यांची जाण असल्यानेच इंधन दरांमध्ये घट : शहा  

नवी दिल्ली: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारने इंधनाच्या दरांना मोदी सरकारने लावलेल्या कात्रीबाबत सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत.  “इंधनाचे घटवलेले दर मोदी सरकारचा सामान्य जनतेप्रती असलेला कळवळा दर्शवतो.” असे ट्विट करत शहा यांनी वित्त मंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले.

आणखीन एका ट्विटद्वारे त्यांनी भाजपा शासित राज्यांमध्ये राज्यसरकारकडून २.५० रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात आल्याच्या निर्णयाचे देखील स्वागत केले आहे. केंद्र व राज्यसरकारने दिलेल्या सवलतींमुळे इंधन आता एकूण ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तत्पूर्वी आज अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सरकार इंधनावर २.५० रुपये सूट देणार असल्याचे जाहीर केले होते.

वाचा सविस्तर: महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त ! मुख्यमंत्र्यांची घोषणा 

केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव २.५० रुपयांनी केले कमी 

राज्यसरकारचा इंधन दर कमी करण्याचा निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी ! -नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)