नवी दिल्ली – पेट्रोलियम कंपन्यांच्या विलीनीकरणाचा विचार नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काही तेल कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार काही कंपन्या परस्परांचे शेअर खरेदी करू लागल्या होत्या. मात्र, प्रधान यांनी सांगितले की, सध्या तरी हा विषय पुढे नेण्याची सरकारची कसलीही इच्छा नाही.