पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत वक्तव्य 

आज सकाळी पाकिस्तानच्या  PAF F-१६ लढाऊ विमानाने भारतीय वायू सीमेमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय वायुसेनेद्वारे पाकिस्तानचे एक विमान पाडण्यात आले असून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आता पाकिस्तानच्या या कुरापतीबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात आले आहे.

“काल भारतातर्फे करण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईची माहिती भारतातर्फे जाहीर करण्यात आली होती. भारतातर्फे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर करण्यात आलेला कालचा हल्ला हा जैश-ए-मोहम्मद ही संघटना भारतावर दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांमार्फत मिळाल्याने करण्यात आला होता. भारतातर्फे करण्यात आलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पाकिस्तानतर्फे भारतीय सैन्य दलांवर हल्ला चढवत प्रतिउत्तर देण्यात आले. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज होती त्यामुळेच पाकिस्तानने आज केलेल्या हल्ल्याला भारतातर्फे अयशस्वी करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय वायुदलाला पाकिस्तानी वायुदलाच्या हल्ल्याची भनक लागताच भारतीय वायुदलातर्फे प्रतिउत्तर देण्यात आले. या हवाई लढ्यामध्ये भारताच्या मिग २१ बोसॉन या लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. भारतीय सैन्याला पाकिस्तानचे हे विमान अवकाशातून पाकिस्तानी भागामध्ये कोसळताना दिसले. या हवाई कारवाईमध्ये भारतीय वायुसेनेचे एक मिग२१ विमान बेपत्ता झाले असून या लढाऊ विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता आहे. पाकिस्तानतर्फे भारताचा एक वैमानिक त्यांच्या ताब्यामध्ये असल्याचा दावा करण्यात आला असून आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)