नयनतारा सहगल यांना कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी पक्षाचा विरोध नाही -राज ठाकरे

मुंबई – यवतमाळ येथे होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादंगाविषयी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची’ अधिकृत भूमिका मांडली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसिध्द केले आहे.

यंदा यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रण होतं. नयनतारा सहगल यांच्या संमेलनातील उपस्थितीला माझ्या एका कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी मनसेचा अध्यक्ष म्हणून माझा अजिबात विरोध नाही”, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे पण नयनतारा सहगल ह्यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांचासमोर जर मराठी साहित्याची समृध्द परंपरा खुली होणार असेल आणि जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही, अस राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नयनतारा सहगल ह्यांना आमचा विरोधी नाही, त्यांनी जरूर यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो, असही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत म्हटले आहे की, मराठी साहित्य संमेलन आपलं संमेलन आहे, सर्व मराठी जनाचं संमेलन आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो मनस्ताप झाला असेल, तर त्याबद्दल मी एक मराठी भाषा प्रेमी या नात्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

मनसे अध्यक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नयनतारा सहगल यांना रोखण्याचा भाजप चा डाव राजसाहेबांच्या पत्रकामुळे उधळला गेला.

तसेच महाराष्ट्र सैनिकांनी यापुढे संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडून नये, अशी तंबीदेखील राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)