पश्‍चिम बंगालमध्ये ऑनर किलिंगची घटना

पोटच्या मुलीची हत्याकरून मृतदेह फेकला नदीत

माल्डा (पश्‍चिम बंगाल) – पश्‍चिम बंगालमध्ये नुकतीच ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांनीच संतापाच्या भरात आपल्या मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. संबंधित आरोपी आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकून दिला होता.

आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचे अफेअर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिची हत्याच करून टाकली. पोलिसांना या घटनेची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन आई-वडिलांना अटक केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आई वडिलांनी आपल्या सोळा वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गंगा नदीत फेकून दिला. धीरेन मोंडल आणि त्याची पत्नी सुमती यांनी हे कृत्य केले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. मोंडल दाम्पत्याची मुलगी त्यांच्या महेंद्रतोला गावाजवळील एका युवकावर प्रेम करत होती.

दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर धीरने आणि मुमती यांनी त्या नात्याला विरोध केला. मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महेंद्रतोला गावातच तिचा खून करून मृतदेह गंगा नदीत टाकून दिला. मोंडल दाम्पत्याच्या शेजाऱ्यांना याचा अंदाज आल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पोलीस ठाण्यात गोपनीय पद्धतीने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मोंडल दाम्पत्याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)