सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला तुरुंगवास

पुणे: स्पीकर बंद करण्याची सूचना देण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्‍काबुक्‍की करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला 6 महिने साधा कारावास आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोटार वाहन न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी हा आदेश दिला आहे.

सुखदेव चंद्रकांत अडागळे (वय-52, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला शिक्षा सुनावली. याबाबत खडक पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश भाऊसाहेब क्षीरसागर यांनी फिर्याद दिली होती. मोठ-मोठ्याने स्पीकर सुरू असल्याबाबत तक्रार आल्याने फिर्यादी त्यांच्या सहकाऱ्याबरोबर 19 डिसेंबर 2015 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कासेवाडी येथे गेले होते. तेथे सुरू असलेला स्पीकर बंद करण्याच्या सूचना केल्या असता अडागळे याने फिर्यादी यांच्या हाताला धरून तू काय नवीन आहेस का? मला ओळखत नाही का? चल येथून निघून जा’ असे म्हणाला. या प्रकरणी सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी 8 साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजात पोलीस राजश्री मोहिते आणि नुरसाहब शेख यांनी मदत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)