लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान – सी. विद्यासागर राव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ओबेसिटी मंत्रा’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो. त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज केले.

-Ads-

राजभवन येथे विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित व लेखिका डॉ.जयश्री तोडकर व पत्रकार संतोष शेणई लिखित ‘ओबेसिटी मंत्रा’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सी. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वणगे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, आपला देश हा 29 वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठे नुकसान होईल. त्यांच्यात जागृती आणायला हवी. जागतिक आकडेवारीनुसार 39 टक्के प्रौढ व्यक्ती अतिरिक्त वजनाच्या असून यातील 13 टक्के लोक लठ्ठपणाशी झुंज देत आहेत. यामुळे सक्तीने प्रत्येक शाळांमध्ये शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वैद्यकीय शिबीर आयोजित करून मुलांमध्ये लठ्ठपणा व योग्य आहार याबाबत जागृती करावी. यासोबत मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजनही करावे, अशी सूचनाही राज्यपाल यांनी केली.

‘मिशन यंग आणि फिट इंडिया’ याबाबत राज्यातील प्रत्येक विद्यापीठात जागृती करण्याबाबत भारतरत्न व माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी सांगितले होते. प्रत्येक युवा, विद्यार्थी, व्यक्तीने दररोज एक तास खेळासाठी द्यायला हवा, याचाही अंमल त्वरित व्हायला हवा, असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करणार- मुख्यमंत्री

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबेसिटी मंत्रा हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींना महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा (ओबेसिटी) हा आजार आहे हे आपणास माहीत नव्हते. यावर जागृती करण्याचं व सामान्यांना माहिती देण्याचे काम डॉ. तोडकर व त्यांची जेटी फाऊंडेशन ही संस्था करीत आहे. त्यांच्याबरोबर टास्क फोर्स स्थापन करून विशेषत: मुलांमधील लठ्ठपणावर शासन पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. शिवाय मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

खाण्याच्या पद्धती, जीवन पद्धती, व्यायाम कसा असावा, आहार कोणता टाळावा, याची माहिती या पुस्तकातून मिळते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती दिल्यास लोकांना याचे गांभीर्य समजेल. लठ्ठपणाशी झगडणाऱ्या कुटुंबाला हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल. डॉ. तोडकर यांच्या लठ्ठपणाबाबतच्या लढ्यांशी शासन सोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)