मध्यप्रदेशात ओबीसींचा कोटा दुप्पट

भोपाळ : मध्यप्रदेशात ओबीसींचा कोटा दुप्पट करून तो 27 टक्के इतका करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे प्रदेश कॉंग्रेसने स्वागत केले आहे. त्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेस समितीने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन अन्य मागासांना न्याय दिला आहे एवढेच नव्हे तर सरकार स्थापन करतानाही त्यांनी मंत्रिमंडळात ओबीसींना 27 टक्के प्रतिनिधीत्वही दिले आहे असे प्रदेश कॉंग्रेसच्या प्रसिद्धी विभागाच्या प्रमुख शोभा ओझा यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या ओबीसींना केवळ 14 टक्के इतकेच आरक्षण होते पण त्याचे प्रमाण आता 27 टक्के इतके करण्यात आल्याने या समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या.

-Ads-

भारतीय जनता पक्षाने उमा भारती, बाबुलाल गौड आणि शिवराजसिंह चौहान हे तीन ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री दिले पण त्यांनी कधीही असा निर्णय घेतलेला नाही किंवा त्यांनी कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे समर्थनही केले नाही असे ओझा यांनी निदर्शनाला आणून दिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)