इंटेरियरमध्ये ‘ओक’चा वापर करताना…

जीवनशैलीतील बदलामागे घरातील अंतर्गत सजावटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मग हे इंटेरियर घराचे असो किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानचे असो. अंतर्गत सजावटीच्या मदतीने घराला अधिकधिक आकर्षक लूक देण्याचा प्रयत्न केला जातो. अंतर्गत सजावटीत ओक लाकडाचा वापर अधिक होताना दिसून येत आहे.

ओक हे भक्कम लाकूड आणि कडू फळे असलेले झाड. जर आपल्याला घर सजवण्याची हौस असेल आणि नवीन लूक देण्याचा विचार करत असाल तर ओक लाकडाशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही. स्टाईल आणि क्वालिटीच्या गरजेला समतोल राखण्याचे काम ओक करते. घरातील वातावरण अधिक उत्साहवर्धक आणि शानदार करण्याचे काम ओक लाकूड करते.

अंतर्गत सजावटीत ओकचा प्रयोग हा घराला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करतो. डिझायनर किंवा इंटेरियर देखील ओक लाकडास प्राधान्य देतात. कारण यात नैसर्गिक सौंदर्य आणि विविधता आहे. ओकसारख्या साहित्याचा वापर करून खोलीचे सौंदर्य आणखीच वाढवू शकतो. एरव्ही साधारण वाटणाऱ्या खोलीचा कायापालट ओकमुळे करणे शक्य आहे. ओक लाकडात नैसर्गिक रंगांचा समावेश आहे. यात काही हलक्या स्वरूपाचेही असतात, की ते खोलीला उजळवण्याचा प्रयत्न करतात. हे रंग हवेशीर, आराम किंवा मनोरंजनासाठी पोषक वातावरण निर्मिती करत असतात. लाकडाचा नैसर्गिक रंगदेखील खोलीला वैशिष्ट्य प्रदान करतो. ऑक्सिडाइज्ड लाकडापासून केलेली अंतर्गत सजावट ही अत्याधुनिक घरातही संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. गडद आणि करड्या रंगाचे लाकड औपचारिक वातावरणाची निर्मिती करते. अर्थात त्याचा प्रयोग प्रत्येक ठिकाणी करू नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिणाम, ओकच्या लाकडापासून तयार केलेले फर्निचर हे डायनिंग रुमला जबरदस्त लूक देऊ शकतात. आधुनिक घरात ओक लाकडाचा वापर हा ट्रेंड नसून तो आवडी-निवडीवर अवलंबून आहे. याप्रमाणे लाकडाचा वापर लिव्हिंग रुममध्ये देखील करता येतो. त्याचा उपयोग डिझायनर तसेच वैयक्तिक पातळीवर देखील केला जातो. घराची अंतर्गत सजावटीत ओकचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. ओक लाकडाच्या नैसर्गिक तत्त्व आणि रंगामुळे खोलीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. ओक लाकडाचा वापर अनेक रंगातून करता येतो. अर्थात हलका रंग हा उपयुक्त राहू शकतो. तसेच हलका गुलाबी, निळा रंग देखील उठावदार आहेत. ज्यांना बोल्ड लूक हवा असेल ते लिव्हिंग रुममध्ये काही मर्यादेपर्यंत गडद रंगाची निवड करू शकतात. याशिवाय खोलीला संपूर्ण सौंदर्य बहाल करण्यासाठी सॅटिन, सिल्क, फॉक्स शैलीतील कुशन कव्हर, चादर किंवा गालीचा याचा वापर करण्यास विसरू नका.

– वनिता कापसे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)