ऑकलंड: दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ विकेट राखून सामना आपल्या खिश्यात घातला. रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्या फंदाजीच्या जोरावर भारताने टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी केली. न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले होते.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 158 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या सुरूवातीच्या चार विकेटस झटपट गेल्या, त्यामुळे 7.5 षटकांत त्यांची 4 बाद 50 अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर आलेल्या राॅस टेलर आणि काॅलिन डी ग्रैंडहोम यांच्या 77 धावांच्या भागिदारीमुळे न्यूझीलंडचा संघ भारतासमोर 159 धावांचे आव्हान उभ करू शकला. राॅस टेलरने 36 चेंडूत (3 चौकार) 42 धावा आणि काॅलिन डी ग्रैंडहोम 28 चेंडूत (1 चौकार, 4 षटकार) 50 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने 4 षटकांत 28 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर खलील अहमदने 2 आणि भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडने दिलेल्या ध्येयाचा पाठलाग करताना सलामीला रोहित शर्माने २९ बॉल खेळत ३ चौकार आणि ४ षट्कार खेचत ५० धावा केल्या. तर त्याला साथ देत शिखर धवनने ३१ बॉल मध्ये ३० धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंतने विजयी खेळी केली आणि सामना जिंकला. त्याला महेंद्रसिंह धोनीने साथ देत १७ बॉलमध्ये २० धावा केल्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा