#NZvSL Test : न्यूझीलंड संघाचा विजय निश्‍चित

ख्राईस्टचर्च – न्यूझीलंडच्या नेल वॅग्नरची भेदक गोलंदाजी आणि अँजेलो मॅथुजला झालेली दुखापत यामुळे 660 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था 6 बाद 261 अशी झाली असल्याने न्यूझीलंडचा कसोटी विजय निश्‍चित मानला जात आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजना यश आले नाही.

पहिल्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणारे ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी आज साफ अपयशी ठरत होते. त्यानंतर फिरकी गोलंदाज एजाज पटेल देखील काही कमाल करू शकला नसल्याने सर्व जबादारी नेल वॅग्नरकडे आली. त्याने मेंडिस आणि चंडिमल याची जमलेली जोडी मेंडिसला बाद करत फोडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोघांनी 318 चेंडूचा सामना करताना 117 धावांची संयमी भागीदारी रचली होती. त्यानंतर त्याने चंडिमल ला उसळत्या चेंडूवर बाद केले तर रोशन सिल्वाला देखील बाद करत त्याने न्यूझीलंडला विजयाच्या समीप नेले.
दिवसातील अन्य एक बळी टीम साऊदीने मिळवला. त्याने डिकवालेला बाद केले. दिवसअखेर परेरा 22 आणि लकमल 16 धावांवर खेळत आहेत. विजयासाठी श्रीलंकेला अजुनही 429 धावांची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)