पोषण महात्म्य (भाग-2)

पोषण महात्म्य (भाग-1)

-डाॅ.तेजस लिमये

पोषण ही सर्वसमावेशक अशी संज्ञा आहे. पोषण म्हटले की शरीराचे, असे चटकन आपल्या डोक्‍यात येते, पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही. मनाचे पोषणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुर्वेदात तर याला विशेष महत्त्व आहे. आज अनेक विवाहित जोडप्यांना मूल होण्यास अडचण येताना पाहतो. त्याची अनेक कारणे असली तरीही काही पोषणमूल्यांचा लहानपणापासून असणारा अभाव हे सुद्धा एक कारण आहे. चाळिशीनंतर रजोनिवृत्तीच्या काळातील पोषण तर खूपच महत्त्वाचे आहे.

लोह, कॅल्शियाम, ई, क, ड जीवनसत्व इत्यादींचा अभाव 10% स्त्रियांमध्ये सरसकट पाहायला मिळतो. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात आयोडीन ह्या खनिजाचे महत्त्वाचे कार्य आहे. पण आज अनेक स्त्रियांना हायपर किंवा हायपो थायरॉईडचा त्रास असतो. हाडांची ठिसूळता, स्नायूंचे आकुंचन प्रसरण होण्याची क्षमता, मानसिक अस्वास्थ्य, इत्यादी त्रास आजकाल सर्वसामान्य आहेत.

प्रत्येक त्रासासाठी काय पोषण असावे हे सांगणे अवघड असले तरीही वर सांगितल्याप्रमाणे सर्व अन्न घटकांचा आलटून पालटून समावेश असणे व संतुलित आहार हेच त्याचे उत्तर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळिशीत सुरू झालेल्या त्रासाचे कारण हे खरेतर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कुपोषणाचा परिणाम असतो. त्यावर ऍलोपथीसारखा तातडीने उपाय होत नाही. वयाच्या एकसष्टीचा मोठा वाढदिवस साजरा करताना पहिल्या शुभेच्छा ह्या आरोग्य संपन्नतेसंबंधी असतात अन्‌ मग इतर शुभेच्छा. कारण पूर्वीपेक्षा आरोग्याच्या तक्रारीमध्ये खूपच वाढ झाली आहे.

ही सगळी परिस्थिती बघता, नियमित संतुलित आहार, व्यायाम, भरपूर पाणी, चाळिशीनंतर काही आरोग्य विषयक चाचण्या करणे आवश्‍यकच असते. मनाच्या पोषणासाठी उत्तम विचार असलेल्या लोकांशी मैत्री, उत्तम पुस्तके, ध्यान, प्राणायाम, उत्तम विचारांचे आदान प्रदान, छंद जोपासणे, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव येणाऱ्या गोष्टींपासून लांब राहाणे आवश्‍यक आहे. शरीराने शक्‍य नसल्यास मनाने तरी ह्या त्रासदायक गोष्टींपासून दूर राहाणे शक्‍य आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्न हवेत. हेच मनाचे पोषण.

आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक बारीक-सारीक पोषणतत्त्वांची गरज असते. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ आलटून पालटून मिळतात ना, हे बघणे खूप गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्याचे प्रमाण किती असावे, हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

पोषण ही सर्वसमावेशक अशी संज्ञा आहे. पोषण म्हटले की शरीराचे असे चटकन आपल्या डोक्‍यात येते. पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही. मनाचे पोषण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषणमूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही. पण मनाचे पोषण होण्याची गरज कोणालाच वाटत नाही. उलट मनाला पोषक अशा फार थोड्या गोष्टी होत असतात. खरेतर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)