‘एनआरसी’ यादीचा होत आहे चुकीचा प्रचार- राजनाथ सिंह

नवी दिल्ली : पूर्वेकडील राज्यांमधून देशात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. यावर चाप बसावा म्हणून आसामचे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप (NRC) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार आसाममधील २.८९ कोटी लोकांचे नागरिकत्व वैध आहे तर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आहे.

“एनआरसी’चा मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून आसाममधील बंगाली नागरिकांचा छळ केला जात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून होत आहे. ‘एनआरसी’ अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मुद्दयावरून लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

-Ads-

दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, एनआरसी फायनल लिस्ट मध्ये ज्यांचे नाव नाही त्यांना आपले नागरिकत्व, ओळख दाखवण्यासाठी संधी दिली जाईल. तसेच एनआरसी यादीचा चुकीचा प्रचार करण्यात येत आहे.

एनआरसी यादीतून कोणत्याही भारतीयाचे नाव हटणार नाही. सर्वाचा यादीत समावेश करण्यात येईल. मात्र भारतीय नागरिक असल्याचे त्यांना स्पष्ट करावे लागेल. एनआरसीची पूर्ण प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत असल्यामुळे याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित करू नये. असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

एनआरसी यादीत ४० लाख लोकांची नावे नसल्यामुळे संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)