एनपीए आणखी वाढणार असल्याचा आरबीआयचा इशारा

मुंबई : सध्या बॅंकांचे ढोबळ एनपीए तब्बल 11.6 टक्‍के असल्यामुळे बॅंकिंग क्षेत्र गलितगात्र झाले आहे. बऱ्याच दिवसांच्या सरकार आणि बॅंकांच्या प्रयत्नानंतरही हे एनपीए वर्षाअखेर वाढून 12.2 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता बॅंकेच्या वित्तीय स्थिरता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर निर्बंध लादलेल्या 11 बॅंकांचे एनपीए सध्या 21 टक्‍के आहे. ते वर्षाअखेरीस वाढून 22.2 टक्‍के होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बॅंकांच्या कर्ज वितरणावर आगामी काळात परिणाम होणार असल्याचे बॅंकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)