आता मायावतींवरच्या सिनेमात विद्या बालन

बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक राजकीय नेत्यांवर सिनेमे बनायला सुरुवात झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव, नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्यावरच्या सिनेमांनंतर आता बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावरही सिनेमा करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि दलितांच्या नेत्या मायावती यांच्या जीवनावरील या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. मायावतींच्या लीड रोलसाठी विद्या बालनचे नाव चर्चेत आहे.

मायावती या गेल्या दिड दशकापासून देशाच्या राजकारणामध्ये प्रस्थ बनून राहिल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यांची कारकिर्द जेवढी लक्षवेधी होती, तेवढीच वादग्रस्तही राहिली होती. त्यापैकी कोणत्या मुद्दयांवर या बायोपिकमध्ये विशेष प्रकाश टाकला जाणार आहे, हे पहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. जर या बातमीमध्ये खरेच तथ्य असेल, तर विद्यासाठी ही खूपच मोठी संधी असणार आहे. सध्या विद्या एका वेब सिरीजमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा रोल साकारते आहे. सुभाष कपूर यापूर्वी “मोगूल’ नावाच्या बायोपिकचे काम करणार होते. मात्र “मी टू’अभियानात त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांना हा सिनेमा सोडून द्यावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)