आता पाकिस्तानकडून समुद्री जिहादींना प्रशिक्षण

नवी दिल्ली- पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आता समुद्राच्या पाण्याखालून हल्ला करण्यासाठीचे प्रशिक्षण आपल्या हस्तकांना देत असून त्यांना तेथे समुद्री जिहादी म्हणून संबोधले जात आहे. भारत सरकारच्या वतीनेच आज गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. खोल समुद्रात कार्यरत असलेल्या मालवाहु जहाजांना किंवा तेल टॅंकर्सना लक्ष्य करण्यासाठी या जिहादींना प्रशिक्षण दिले जात आहे.

तथापि भारतावर पुन्हा 26/11 प्रमाणे हल्ला करण्याची योजना त्यांनी आखली आहे की नाही याची नेमकी माहिती अजून मिळालेली नाही असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. पण त्यांच्याकडून हे जे नवीन जिहादी गट तयार केले जात आहेत त्यांच्याकडून भविष्यात समुद्र मार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे असे ते म्हणाले. हा समुद्री जिहाद भारताच्या विरोधातच आहे असे मात्र स्पष्ट होत असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)