आता ते करणार डॉक्टर म्हणून काम ; डॉ. अडागळे यांची आरोग्य विभागात बदली ( प्रभात प्रभाव )

सुनील राऊत /पुणे : महापालिकेत झाडूवला म्हणून काम करताना डॉक्टरकी पूर्ण केलेल्या डॉ. तुषार अडागळे यांची अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागात बदली झाली आहे. डॉक्टर तुषार यांचा हा झाडूवला ते डॉक्टर हा प्रवास दैनिक प्रभातने 26 फेब्रुवारी रोजीच्या प्रभात मध्ये “झाडूवला ते डॉक्टर ” या वृताद्वारे समोर आणला. त्याला प्रतिसाद देत डॉ. अडागळे यांची बदली महापालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे.

मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील करकंब या गावचे तुषारचे कुटूंब 50 ते 60 वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झाले.तुषारची आजी महापालिकेत झाडूवाला म्हणून कार्यरत होत्या. लहानपणीच आई गेलेल्या तुषारची जबाबदारी वडीलांनी सांभाळली. आजीच्या मृत्युनंतर डॉ. तुषार महापालिकेत 2008 मध्ये झाडूवाला या पदावर वारसा हक्काने नोकरीस रुजू झाले. कायम स्वरूपी शासकीय नोकरी मिळाल्याने तुषारच्या कुटूंबिय खुश होते. मात्र, या वर्षी तुषार डॉ. डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडीसिन ऍन्ड सर्जरी (बीएचएमएस)ला पहिला वर्षाचे शिक्षण घेत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झाडूवाला म्हणटले की रोजचे झाडणकाम तसेच कचरा उचलण्याचे काम मात्र, डॉ. तुषार हे काम कोणत्याही कुरबुरू विना करत होता. मात्र, त्याच वेळी डॉक्‍टरकीचे शिक्षण पूर्ण करण्याची सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याला नशिबाची साथही मिऴाली.2008 मध्येच उरूळी देवाची येथील कचरा डेपोचे आंदोलन अधिक तीव्र झाले असल्याने कर्मचाऱ्यांना तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागत होते. त्यावेळी रात्री काम करून दिवसा महाविद्यालीयन शिक्षण घेत तुषारने हे यश 2015 मध्ये संपादन केले आहे.

अखेर मिळाले योग्य काम

तुषाराने डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ही झाडूवला म्हणूनच काम केले. मात्र, त्याची ही यशोगाथा समोर येताच, त्याला योग्य काम मिळावे यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी पुढाकार घेत, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्या कार्यालकडे त्याची तात्पुरती बदली केली आहे. त्यानुसार बदलीचे आदेश तुषार यांना देण्यात आले असून आज दुपार पासूनच ते आरोग्य विभागात रुजू झाल्याचे मोळक यांनी दैनिक प्रभातशी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)