आता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला

गेल्या सहा वर्षांच्या करिअरनंतर आता कुठे तापसीला सिनेमा निवडण्याचा चॉईस मिळायला लागला, असे तिला स्वतःला वाटायला लागले आहे. ‘बदला’ या थ्रिलर सस्पेन्स फिल्मनंतर एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीच्या रुपात तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. तोपर्यंत केवळ सपोर्टिंग रोल आणि लीड अॅक्‍ट्रेसच्या छबीमध्येच तिच्याकडे बघितले जाऊ लागले होते.

थोडक्‍यात पूर्वीच्या अॅक्‍ट्रेसना एकाच श्रेणीमध्ये काम करायला लावण्याची निर्मात्यांची सवय होती. “कमर्शियल’ आणि “ऑफ बीट’ या दोनच श्रेण्यांमध्ये प्रामुख्याने अॅक्‍ट्रेसची वर्गवारी केली जात असे. त्याशिवाय वेगळा पर्याय क्‍वचितच निवडला जायचा. आताच्या कोणत्याच अॅक्‍ट्रेसला असे एकाच श्रेणीमध्ये काम करायला लावणे शक्‍य नाही, कोणत्याही अॅक्‍ट्रेसला असे टॅग लावताना सतरावेळा विचार करायला लागतो आहे. हे तापसीने दाखवून दिले आहे. त्यामुळेच तिच्याकडून अॅक्‍शन, रोमान्स, सस्पेन्स, थ्रिलर अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांची अपेक्षा सहज केली जाऊ शकते आहे.

तापसीने आता सिनेमे निवडण्याच्याबाबतच्या स्वतःचे निकष पक्के केले आहेत. तिचा पहिला आणि एकमेव निकष म्हणजे एक प्रेक्षक म्हणून जो सिनेमा बघायला आवडेल, त्या सिनेमातच काम करायचे हा आहे. हेच एकमेव कारण आहे की ज्यासाठी तिने मध्यममार्ग निवडला आहे. पूर्ण कमर्शियल किंवा “ऑफबीट’ सिनेमामध्ये स्वतःला झोकून देण्याचा धोका तिने टाळला आहे. आता बॉलिवूडमधील गाजलेल्या दिग्दर्शकांच्या एकापेक्षा अधिक सिनेमांमध्ये तापसीची वर्णी लागली आहे. डेव्हिड धवन, शुजित सरकार, नीरज पांडे यांच्याबरोबर तापसीने यापूर्वीच काम केले आहे. आता अनुराग कश्‍यपच्या सिनेमामध्ये वर्णी लागायची ती वाट बघते आहे.

“सांड की आंख’मध्ये प्रथमच तिला भूमी पेडणेकरबरोबर म्हातारीचा रोल करायचा आहे. या सिनेमाचे नाव पूर्वी “वुमनियां’ असे ठरले होते. मात्र नंतर ते बदलले गेले. त्याशिवाय “हाऊसफुल्ल 4′ सारखा धमाल कॉमेडी सिनेमाही तिच्याकडे आहे. त्यातून तापसीच्या अभिनयाचे आणखी वेगळे पैलू समोर येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)