आता तृणमुल कॉंग्रेसही मंदिरांच्या स्पर्धेत 

कोलकाता: तृणमुल कॉंग्रेसनेही आता हिंदुत्वाच्या वातावरणात सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार करून मंदिरे बांधण्याचा चंग केला आहे. त्यांनी असनसोल भागात दहा सुर्य मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. असनसोल महापालिकेचे महापौर आणि तृणमुल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्रकुमार तिवारी यांनी ही घोषणा केली ते म्हणाले की पुढील वर्षात आम्ही हे आश्‍वासन पुर्ण करू. या भागात उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्या स्थलांतरीतांची संख्या अधिक आहे. त्यांची सहानुभुती मिळवण्यासाठी पक्षाच्यावतीने ही घोषणा करण्यात आली आहे.

असनसोल भागात लोकसभेच्या एकूण पाच जागा आहेत. दुर्गपुर आणि असनसोल भागात हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे लोक छट पुजा मोठ्या प्रमाणात करतात. त्यांना आपली पुजा करणे सोयीचे व्हावे यासाठी ही मंदिरे बांधली जाणार आहेत असे ते म्हणाले. लोकांकडूनच निधी गोळा करून ही मंदिरे बांधली जाणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)