आता 20 रुपयांची येणार नवीन नोट

मुंबई: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच 20 रूपयांची नवीन नोट चलनात आणणार आहे. 200, 2000 रूपयांच्या नोटा चलनात आणण्याशिवाय 10, 50, 100 आणि 500 रूपयांच्या नोटा आधीच नव्या रंगरूपात सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरबीआयच्या एका अहवालाच देण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेवर एक ऐतिहासिक फोटो असणार आहे. हा फोटो महाराष्ट्रातील अजिंठा गुफेचाही असू शकतो. अजिंठा गुफेला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. 20 रुपयांची नवी नोट ही जुन्या नोटेपेक्षा 20 टक्के छोटी असणार आहे. नव्या आणि अतिरिक्त सुरक्षा फीचरचा या नोटेमध्ये समावेश करण्यात आला आहे. 20 रुपयांची नवी नोट ही नोटाबंदीनंतर बाजारात येणारी सातवी नवी नोट ठरणार आहे. परंतु नव्या नोटेच्या रंगाबाबत आरबीआयने कोणताही खुलासा केलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोव्हेंबर 2016 पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, 31 मार्च 2016 पर्यंत 20 रूपयांच्या नोटांची संख्या 4.92 अब्ज होती. जी मार्च 2018 पर्यंत 10 अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या 9.8 टक्के इतकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)