आता सिनेमात काम करणार नाही – करिष्मा

करिष्मा कपूर गेल्या 7 वर्षात कोणत्याही सिनेमामध्ये दिसलेली नाही. तिच्या फॅन्ससाठी ही फारशी काही चांगली खबर नाही. पण करिष्मा वेबफिल्ममध्ये येण्याचा विचार करते आहे, ही खबर तर तिच्या फॅन्ससाठी निश्‍चितच दिलासादायक असू शकते. करिष्माने आता बॉलीवूडच्या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये कामच करायचे नाही, असे ठरवले आहे. त्याचे कारण म्हणजे तिची मुले अजून लहान आहेत आणि तिला त्यांच्या संगोपनात वेळ घालवायचा आहे. याचा अर्थ ऍक्‍टिंगचे करिअरच सोडून द्यायचे असे काही तिने ठरवलेले नाही.

तिने सिनेमा व्यतिरिक्‍त ऍडस, फॅशन इव्हेंटस, ऍक्‍टिंग वर्कशॉप आणि काही निवडक सिनेमांमध्ये गेस्ट ऍपिअरन्स म्हणून काम करण्यास तिची काहीच हरकत नाही. तिने हे सगळे पर्याय खुले ठेवले आहेत. शाहरुखच्या आग्रहास्तव तिने “झिरो’मध्ये छोटा रोल केला देखील होता. कॅमेऱ्यासमोर तासन तास उभे राहून ऍक्‍टिंग करण्याची सवय आता सुटली आहे. त्यामुळे तिला थोडे नर्व्हस व्हायला झालेही होते. पण ऍक्‍टिंग आपल्यात अंतर्भूत असायला पाहिजे. अभिनयाचा गुण आपल्यात जर असेल, तर तो कोठेही जात नाही. काम करताना आनंद वाटला पाहिजे, इतकेच. असा आनंद मिळेल असे काही करण्याची संधी ती इतकी वर्षे शोधत होती. याशिवाय समायरा आणि कियान या दोन्ही मुलांच्या संगोपनात तिला जास्त आनंद मिळतो आहे.

पण आता तिने पुन्हा काम करावे, असे तिच्या मुलांनाही वाटायला लागले आहे. त्यामुळे “मुंबई मॉमझिलास’ या वेबफिल्ममध्ये ती काम करते आहे. पण तेथेही तिला मुलांच्या आईचाच रोल करायचा आहे. मुलांच्या संगोपनात गुरफटलेल्या आई आपल्या भावना व्यक्‍त करण्यासाठी ब्लॉगचा आधार घेते. त्यातूनच ही कथा उलगडत जाते आहे. याशिवाय रेडिओ जॉकी आणि टीव्हीवरचा एक शो होस्ट करण्याची आपली हौसही तिने भागवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)