आता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज 

नागपूर – देशासमोर नक्षलवादाचा प्रश्न गंभीर होत असताना नक्षलींनी आपली ताकद आणखी वाढवली आहे. नक्षलींनी नेतृत्व बदल करत खतरनाक बसवराज याच्याकडे सोपविले आहे. 72 वर्षीय मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडून नक्षली फळीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बसवराजने सर्व कारभार आपल्या हाती घेतला आहे. सामूहिक निर्णय घेऊनच नक्षलींनी सूत्रबदल केल्याची माहिती मिळते.

नक्षलींचा जंगलातला, युद्धभूमीचा जोर कमी पडू लागला असून महाराष्ट्रात 40 माओवादी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव कमी झला आहे. तर नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पणाचे प्रमाणही गेल्या काही काळात लक्षणीय वाढले आहे. त्यांचे पैशाचे सर्व मार्गही बंद झाले असून शहरी बुरखाही बऱ्यापैकी फाटला आहे. नक्षलींचे प्रेरणास्थान असलेले साईबाबा आणि रोना विल्सन हे गजाआड झाले आहेत.

गणपती नक्षली विचारांचा आहे, पण बसवराज थेट जंगलात युद्ध करणारा, जास्त आक्रमक असल्याचे बोलले जाते. 63 वर्षीय नंबाला केशव राव उर्फ बसवराज हा मूळचा आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. वारंगलच्या रिजनल इंजिनियरिंग म्हणजेच आत्ताच्या एनआयटीचा पदवीधर आहे. आंध्र प्रदेशातील दोन आमदारांना मारल्याचे ऑपरेशन हे बसवराज पॅटर्न म्हणून ओळखले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)