आता बॅंकेची परीक्षा मराठीत

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांचा समावेश

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये बॅंकेची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना गुड न्यूज दिली आहे. आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection) च्या वतीने विविध 45 प्रादेशिक ग्रामीण बॅंकांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला असून यात मराठीचाही समावेश आहे.

बॅंक परीक्षांमध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा उपलब्ध होत्या. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत होते. त्यामुळेच प्रादेशिक भाषांचाही पर्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत होती. अखेर निर्मला सीतारमण यांनी 13 भाषा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा यामध्ये समावेश आहे. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, भाषा निवडण्याचा पर्याय तर देण्यात आला, पण IBPS RRB recruitment ला अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे तारीख वाढविण्यासह उमेदवारांना भाषा निवडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)