आता पाच वर्षात तुम्ही काय केले ते सांगा – प्रियांका गांधी

संग्रहित छायाचित्र....

कॉंग्रेस विरोधी प्रचाराची एक्‍सपायरी डेट संपली

लखनौ: कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले हा प्रश्‍न सातत्याने विचारला गेला पण त्या प्रश्‍नांची एक्‍स्पायरी डेट आता संपली असून आता तुम्ही गेल्या पाच वर्षात काय केले ते जनतेला सांगा असे आव्हान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे नाव न घेता दिले आहे.

प्रियांका गांधी या तीन दिवसांच्या उत्तरप्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर असून आपल्या यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. योगी अदित्यनाथ यांच्या सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने काढण्यात आलेल्या प्रगती पुस्तकाविषयी त्यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की दोन वर्षांच्या कामगीरीचे दिमाखदार प्रगती पुस्तक काढणे चांगले असते पण जमीनीवरील हकिकत मात्र पुर्ण वेगळी आहे. ती मला येथे पहायला मिळाली आहे. कॉंग्रेसच्या विरोधात सतत प्रचार केला गेला आणि कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले असा प्रश्‍न सातत्याने विचारला गेला पण या प्रश्‍नांची मुदत उलटून गेली असून आता त्यांनी पाच वर्षे केंद्रात सत्तेत राहुन नेमके काय केले याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे असे प्रियांका गांधी यांनी सुनावले आहे. गेले दोन दिवस त्या गंगेतून प्रवास करून त्या परिसरातील रहिवाशांशी संवाद साधत आहेत.

आज त्यांनी सीतामढी येथील मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या योगी अदित्यनाथ यांच्या सरकारला दोन वर्ष; पुर्ण झाली आहेत त्यांनीही मोठमोठे दावे केले असले तरी येथील कोणत्याच घटकाला ते न्याय देऊ शकलेले नाहीत. मला अनेक अंगणवाडी शिक्षक, शिक्षा मित्र , आशा कार्यकर्त्या भेटल्या त्यांची या राज्यात पिळवणूक सुरू आहे. त्यांना सतरा हजार रूपये पगार दिला जाईल असे आश्‍वासन भाजपने दिले होते पण काहीही झालेले नाही. आजही त्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे असे त्या म्हणाल्या.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले होते गांधी कुटुंबासाठी निवडणूका म्हणजे केवळ पिकनिक असते अन्यथा ते इटालित असतात. त्यांच्या या विधानावर उत्तर देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की मी गेली तीन चार वर्ष इटालिला गेलेले नाही वास्तविक मला माझ्या आजीला तेथे भेटायला जायचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)