आता सत्यपालसिंह म्हणतात ‘हनुमान’ आर्य 

नवी दिल्ली: महाबली हनुमान नेमके कोण होते यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जणू सध्या वादग्रस्त विधाने करण्याची चढाओढ लागली आहे. एकाने हनुमान दलित होता असे म्हटले आहे, त्यावर भाजपचा दुसरा नेता हनुमान अदिवासी होते असे म्हणतो तर आता या वादात केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनीही उडी घेतली असून हनुमान हे आर्य होते असे विधान त्यांनी केले आहे.

सत्यपाल सिंह हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी म्हटले आहे की रामराज्याच्या काळात जातपात नव्हती. कोणीच दलित, अदिवासी किंवा शोषीत नव्हते. त्यामुळे हनुमानांना कोणतीही जात चिकटवता येणार नाही. वस्तुत: ते आर्य होते असे सत्यपालसिंह म्हणाले आहेत. त्या जमान्यात केवळ आर्यच होते. त्यामुळे हनुमान हे आर्य महापुरूष ठरतात असे विधान त्यांनी केले आहे.

योगी अदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते असे विधान केल्यानंतर त्यांचे विधान राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी खोडून काढत हनुमान हे आमच्या म्हणजेच अदिवासी समाजाचे होते असे म्हटले होते. आता सत्यपाल सिंह यांनी या दोघांचीही विधाने खोडून काढत हनुमान हे आर्य होते असे म्हटल्यामुळे हा विषय आता पुन्हा ताणला जाण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)